कांदिवलीत ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन - उद्घाटन
कांदिवलीमध्ये ग्रॉवेल्स शॉपिंग मॉल येथे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. येथे ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरु व्हावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्नशील होते. ज्येष्ठ नागरिकांना हे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच मुंबईच्या लसीकरणावरही महापौरांनी प्रतिक्रिया दिली आहे.