राज्यात संचारबंदीचे निर्बंध कडक; अत्यावश्यक सेवांच्या वेळेत बदल - new-restrictions-and-curfew-for-15-days-in-maharashtra-
मुंबई - राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध घातलेले आहेत. 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही कोरोना आटोक्यात येताना दिसून येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने काही नियम अधिक कठोर केले आहेत. यात किराणा मालाची दुकानं सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत अशी चार तासच सुरू राहतील, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ऐरवी गजबजलेले असणारे वरळी मार्केट मध्ये शुकशुकाट दिसून आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी