मराठी नवकवितेचे जनक बा. सी. मर्ढेकरांच्या नशिबी उपेक्षाच!
दोन वर्षांत 36 लाख रुपये खर्चून इमारतीचे काम पूर्णत्वास गेले. तरीही वास्तूचे लोकार्पण झाले नाही. आज 10 वर्षे लोटली आहेत तरी गावामध्ये ग्रंथालय सुरू झाले नाही. 'साहित्य संमेलनांतील बडेजावावर दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होते. परंतु, बा. सी. मर्ढेकरांसारख्या साहित्य सरस्वतीच्या खऱ्या मानकऱ्यांचा मृत्यूनंतरही उपेक्षाच वाट्याला येतात. हे चित्र बदलणार की नाही,' असा प्रश्न विचारला जात आहे.