महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

लघु उद्योजकांसाठी कोकणात पायाभूत सुविधांची गरज

By

Published : Mar 7, 2021, 7:58 PM IST

Updated : Mar 8, 2021, 10:46 AM IST

रायगड - देशाच्या अर्थचक्रात सर्वात महत्त्वाचा वाटा हा लघु उद्योजकांचा आहे. सर्वाधिक रोजगार निर्मितीही छोट्या उद्योगातून होत असते. मात्र, शासनाचे लघु उद्योजकांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कोकणात छोट्या उद्योजकांसाठी पायाभूत सुविधा तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पात छोट्या उद्योजकाला भरारी देण्यासाठी भरीव तरतूद करणे अपेक्षित आहे, असे मत उद्योजक प्रवीण सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. अलिबागचे उद्योजक प्रवीण सरनाईक यांनी 'केमक्लीन सर्व्हिसेस' च्या माध्यमातून देशासह जगभरात इंडस्ट्रीयल व्यवसाय सुरू आहे. कोरोनाच्या संकटात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असला तरी आजही ते आपला व्यवसाय नेटाने करीत आहेत. आर्थिक घडी बसविण्यात छोट्या उद्योगांचा महत्त्वाचा वाटा आहे. मार्च 2020 मध्ये सुरू झालेल्या कोरोना संकटामुळे छोट्या उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अद्यापही कोरोना संकट असल्याने अजूनही छोट्या उद्योगांना उभे राहण्यास गती मिळत नाही. कोरोना काळात उद्योग बंद असला तरी कामगारांचे पगार हे द्यावेच लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या बजेटमध्ये छोटे उद्योगांना भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. कोकणात छोट्या उद्योगांना पायाभूत गरजकोकणात मोठ्या प्रमाणात छोटे उद्योग व्यवसाय केला जातो. मात्र, असे असले तरी छोट्या उद्योगासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. इम्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यास उद्योगांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे कोकणात छोटे उद्योगासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा शासनाने करून देणे गरजेचे आहे. बँकांकडून सहकार्याची अपेक्षाकोरोना तसेच निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा कोकणात मोठ्या प्रमाणात बसला. छोट्या उद्योगांवरही याचा परिणाम दिसला. छोट्या उद्योजकांना पुन्हा उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ महत्वाचे आहे. यासाठी शासनाने बँकांना सांगून कर्ज पुरवठा करणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे तारण नाही अशांनाही कर्ज देण्यासाठी शासनाने पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत प्रवीण सरनाईक यांनी मांडले आहे.
Last Updated : Mar 8, 2021, 10:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details