Sharad Pawar : शरद पवार यांची पिंपरी मेट्रोतून सफर - Sharad Pawar tour in pimpri metro
पिंपरी-चिंचवड (पुणे) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फुगेवाडी ते संत तुकाराम असा मेट्रोतून प्रवास करून मेट्रोच्या कामाचा आढावा ( Sharad Pawar visit pimpri metro station ) घेतला. सकाळी साडेनऊच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकावर दाखल झाले, तेथून त्यांनी संत तुकाराम नगर मेट्रोने प्रवास केला. दीड तास शरद पवार यांनी बैठकीद्वारे मेट्रोची सविस्तर माहिती घेतली. यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित हे उपस्थित होते.