शेतकऱ्यांच्या संघर्षाला 'सलाम'; कृषी कायदे रद्द केल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - farm law cancelled modi government news
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (sharad pawar first reaction on farm law cancelled) निवडणुकीत शेतकरी प्रश्न विचारतील म्हणून मोदींनी हे केले. झाले ते उत्तम झाले. 'संघर्षरत शेतकऱ्यांना सलाम', अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रपुरात व्यक्त केली. (sharad pawar in chandrapur) केंद्रातील भाजप सरकारने हे कायदे काही तासात मंजूर केले. आम्ही चर्चेचा हट्ट केला. मात्र, सरकारने ऐकले नाही. शेती देशाचा आत्मा आहे. कायदे करायचे असेल तर एकत्र बसू, हा राजकीय विषय नाही, असेही आम्ही सांगितले. मात्र, आमचे ऐकले नाही. सरकारची ही भूमिका अतिरेकी भूमिका होती हे सिद्ध झाले. उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब निवडणुकीत शेतकरी प्रश्न विचारतील, म्हणून हे कायदे रद्द झाले. (farm law cancelled by modi government)