एनसीबीची कारवाई : पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला घेतले ताब्यात - Cordia Cruz Drugs Party Case
मुंबई - ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. मुंबई एनसीबीने काल (मंगळवारी) रात्री पवई परिसरातून आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन एनसीबी कार्यालयात नेले. अचिंत कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला मुंबईच्या पवई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून काही प्रमाणात औषधेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती आहे. ही व्यक्ती क्रुझ प्रकरणाशी संबंधित आहे. मुंबई एनसीबीसीने काल रात्रीपासून वांद्रे, जुहू आणि गोरेगाव भागात छापेमारी केली आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी विनय दुबे यांनी घेतलेला हा आढावा...