महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते गोंदियात ध्वजारोहण - 75th independence day

By

Published : Aug 15, 2021, 11:32 AM IST

गोंदिया - भारतीय स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आज गोंदियात उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गोदियाचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते गोंदिया येथील कारंजा पोलिस मुख्यालयाच्या कवायती मैदानात झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह माजी सैनिक, विद्यार्थी आणि नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. झेंडा वंदनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि नागरीकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व समान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details