'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' : 'या' कारणाने महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आल्या राजकारणात - etv bharat live
मुंबई - नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. या विशेष पर्वात 'ईटीव्ही भारत'ने 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आपण दररोज विविध क्षेत्रातील नामवंत, कर्तृत्ववान महिलांशी गप्पा करतोय. आज आपल्यासोबत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संवाध साधणार आहोत. यावेळेस त्यांनी राजकारणातील अनुभव विषद केले. मला राजकारणात यायची इच्छा नव्हती. मात्र, माझे वडील काही कारणाने निवडणूक हरले. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होते. ते अश्रू मला सहन झाले नाही. त्यानंतर मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.