महाराष्ट्राच्या नवदुर्गा : सारेगामापा जिंकणं म्हणजे गायिका होत नाही; नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रमात गायिका वैशाली माडेंनी मांडलं मत - महाराष्ट्राच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रम
हैदराबाद - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात एक उत्तम गायिका म्हणून प्रस्थापित झालेल्या विदर्भकन्या वैशाली माडे यांनी सहभाग घेतला. यावेळी 'ईटीव्ही भारत'ने मोरवणकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सारेगामापा जिंकणं म्हणजे गायिका होत नाही, असं मत मांडलं. याबरोबरच त्यांनी आपल्या गायनाचा प्रवास, त्यांचे गुरू सुरेश वाडकर यांचाबद्दल, तसेच हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचा कामाचा अनुभव कसा होता, याबाबतही सांगितले. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाचं सावट गेलेलं नाही. म्हणून थोडासा संयम ठेवायची आवश्यकता घ्यायची गरज आहे. सर्वांनी धीर धरुन काळजी घ्यावी, असा संदेश दिला.