महाराष्ट्राच्या नवदुर्गा : स्त्रियांनी स्वत:मधील आत्मबल जागवावं - सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे - महाराष्ट्राच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रम
हैदराबाद - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सहभाग घेतला. या संवादात 'ज्या देवीची आपण नवरात्रीच्या निमित्ताने पुजा करतोय ती देवी शक्तीचं स्थान आहे. ती देवी आहे आणि तीच शक्ती प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. स्त्रिया खूप बलवान असतात. त्यांच्याकडे आत्मिक शक्ती खूप आहे. जसे आपण नवरात्री जागवतो त्याप्रमाणे ती आत्मिक शक्ती जागवणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे आणि प्रत्येक पुरुषाने तिच्यातलं ती शक्ती जागवण्याची मुभा तिला द्यावी, ते पुरुषांचं कर्तव्य आहे', असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या विशेष संवादात त्यांनी त्यांचे अमेरिकेतील अनुभवांबद्दल तसेच भारतातीलही त्यांच्या अनुभवांबद्दल दिलखुलासपणे चर्चा केली.