आजपासून नाट्यगृह सुरू, ईटीव्ही भारत'कडून आढावा
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षापासून बंदी असलेले नाट्यग्रह चित्रपटगृह आज पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे. 50% उपस्थितीत नाट्यगृह सुरू करता येथील असा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित झाले होते. रांगोळीसह विविध पोशाख परिधान करून कलाकारांनी आनंद व्यक्त केले. सरकारने 50 टक्के क्षमतेने नाट्यग्रह सुरू केलेली आहे ही नाट्यग्रह 100% उपस्थितीत सुरू करावी आणि आम्हाला दिवाळीची भेट द्यावी अशी मागणीही या कलाकारांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, बालगंधर्व रंगमंदिर येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-