National Drummer Day : संगीतात ड्रम वाद्याला विशेष महत्व.. पाहा विशेष रिपोर्ट - संगीतात ड्रम वाद्याला विशेष महत्व
15 नोव्हेंबर हा दिवस नॅशनल ड्रमर्स डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.. संगीतामध्ये ड्रम या वाद्याला विशेष महत्व आहे. ड्रम या वाद्यातील बिटस, म्युझिक,रिधम यामुळे माणसाला एक नवी ऊर्जा मिळत असल्याचं संगीतकार सांगतात. नाशिकमध्ये गेल्या सहा वर्षांपासून युवकांचा एम एच द 15 बँड दरवर्षी सामाजिक कार्यासाठी नॅशनल ड्रमर्स हा दिवस साजरा करतात. या बँडमधील ड्रम वादक विनेश नायर याने आतापर्यंत सलग 16 तास, 30 तास व 51 तास सलग ड्रम वाजवण्याचा विक्रम केला आहे. त्याला या बँडमधील कलाकार गायक राहुल आंबेकर, गणेश जाधव यांनी साथ दिली आहे. संगीताबाबत नागरिकांना आवड निर्माण व्हावी, यासाठी येत्या काही दिवसात सलग 100 तास ड्रम वादन करण्याचा मानस असल्याचे ड्रम वादक विनेश नायर याने ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.