Nashik Children Vaccination : नाशिक जिल्ह्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण - नाशिक महानगरपालिका लसीकरण केंद्र
नाशिक - आजपासून (दि. 3 जानेवारी) 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणासाठी ( Nashik Children Vaccination ) सुरुवात झाली आहे. यासाठी नाशिक शहरात सहा केंद्रावर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले. 100 डोस ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालय, जुन्या नाशकतील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय,नाशिक पुणे रोड वरील समाज कल्याण कार्यालयात, सिडको भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सातपूरमधील ईएसआयएस रुग्णालय अशा सहा ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू असून याला किशोरवयीन मुलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याबाबतचा आढावा ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने