कृष्णेच्या काठावर पोलिसांची छावणी, आपत्ती व्यवस्थापन बचाव दल तैनात - कृष्णा नदीतीरावर पोलिसांचा बंदोबस्त
कोल्हापूर- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंचगंगा परिक्रमा यात्रा रविवारी नरसिंह वाडी येथे पोहोचेल. त्यानंतर स्वाभिमानीचे आंदोलक शेतकरी आणि राजू शेट्टी यांनी कृष्णेच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त कृष्णेच्या काठावर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आपत्ती दल देखील तैनात केले असून कृष्णेच्या पात्रात सहा रबरी बोट तैनात ठेवल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत एकही आंदोलनकर्ता किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता नदीपात्रात येणार नाही, असा चोख बंदोबस्त जिल्हा प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. याचा कृष्णेच्या काठावरून आढावा घेतला आहे. ईटीव्ही भारताचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी...