'लॉकडाऊन झाल्यास हातावर पोट असणाऱ्यांच्या विचार झाला पाहिजे' - Nana Patole over COVID 19 situation
नागपूर - महाराष्ट्रात लसीचा पुरवठा कमी झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने उलट आरोप करून राजकारण करणे बंद केले पाहिजे. मृत्यूवर राजकारण होता कामा नये. मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची भाजपची भूमिका बदलली पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केली. राजकरण न करता एकत्र येऊन कोरोनाची साखळी तोडणाच्या भूमिका घ्यावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते नागपुरात विमानतळावर बोलत होते.