लहानपणी 'या' पैलवानाचे फॅन होते नागराज मंजुळे - कुस्ती
सोलापूर - नागराज मंजुळे हे लहानपणी कुस्तीचे शौकीन होते. लहानपणापासून आपण नारायण पाटील यांच्या कुस्तीचे शौकीन होतो, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले आहे. तरूण वयात कुस्तीचे मैदान गाजवणारे नारायण पाटील हे सध्या करमाळ्याचे आमदार आहेत. लहानपणी नारायण पाटलांच्या कुस्त्या पहायला जायचो, असे मंजुळे यांनी सांगितले.