कोरोना लसीकरणासाठी सायन रुग्णालयातील तयारी पूर्ण - मुंबई सायन रुग्णालय कोरोना लसीकरण
मुंबई - कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता लसीकरणचा पहिला टप्पा सुरू होत आहे. शनिवारी (आज) मुंबईत नऊ ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून सकाळी साडेदहा वाजता लसीकरणाला सुरुवात होणार आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे स्वतः सर्वप्रथम लस टोचून घेणार आहेत. सायन रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...