केंद्र सरकारने आत्मपरिक्षण करावे - संजय राऊत
मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. जर सरकारचा लेखाजोखा पाहिला तर पंडित नेहरूंपासून ते राजीव गांधी या काळात देश उभा राहिला आहे. या देशांमधील अनेक प्रकल्प अनेक योजना त्या काळात दिसत आहेत आणि मागच्या काळाच्या पुण्याईवर आजही देश तरलेला आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही. प्रत्येकाला टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी यांच्यासारखे व्हायचे नाही आहे. सामान्यांना आपण प्राथमिक गरजा देऊ शकलो आहोत का? हा प्रश्न केंद्र सरकारने स्वतःला विचारणं गरजेचे आहे, या शब्दात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.