पाहा 'टीआरपी' घोटाळ्याबाबत काय म्हणाले मुंबईचे पोलीस आयुक्त - मुंबई पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद बातमी
मुंबई - पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.