मुंबईतील रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदीसह कारवाईला सुरूवात
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पोलीस प्रशासन युद्धपातळीवर मैदानात उतरले आहे. मुंबईत अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलिसांकडून नाका-बंदी सुरू आहे. यात पोलीस प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करत आहेत. तसेच मुंबईत कलर कोड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ज्या गाड्या आहेत, त्या वाड्यांना पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचे स्टिकर देण्यात आलेले आहेत. तसेच जे लोक विनाकारण घराच्या बाहेर फिरत आहेत, अशांवर कारवाई केली जात आहे. याचाच आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधींनी.