Mumbai Landslide:आदित्य ठाकरे यांनी केली सूर्यनगरची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर - Aditya Thackeray inspects
मुंबई - शनिवारी 200 मीमी पेक्षा जास्त पाऊस पडला. दोन वर्षापूर्वी याठिकाणी संरक्षक भिंत बांधली गेली होती. त्यामुळे याठिकाणी जीवितहानी कमी झाली. मृतांच्या नातेवाईकांना सीएम रिलीफ फंड आणि डिझास्टर मॅनेजमेंटकडून पाच लाखांची मदत दिली जाणार. यासोबत जखमींच्या उपचारांचा खर्च देखील उचलला जाईल, अशी माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी आज (रविवारी) विक्रोळी सूर्यनगर येथील दुर्घटनेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.