विकेंड लॉकडाऊन; ऐन लग्न सराईत मुंबईतील झवेरी बाजार बंद
मुंबई - शहरासह राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लॉकडाऊन घोषित केला जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम मुंबईतील झवेरी बाजारात पाहायला मिळाला. ऐन लगीन सराईत ग्राहकांना सोन्याचे दागिने विकत घेण्यासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मुंबईतील जवेरी बाजार परिसर हा सोन्या-चांदीच्या सराफा दुकानांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी दररोज करोडोंची उलाढाल होत असते. मात्र , विकेंड लॉकडाऊमुळे सराफा बाजार परिसर ओस पडलेला दिसून आला. या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
Last Updated : Apr 11, 2021, 3:21 PM IST