महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हाजी आली दर्ग्यावरही मुस्लिम बांधवांनी टेकला माथा - mumbai haji ali dargah news

By

Published : Nov 16, 2020, 12:24 PM IST

Updated : Nov 16, 2020, 3:03 PM IST

मुंबई - मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊनच्या काळात गेले आठ महिने सर्व व्यवहार बंद होते. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असताना राज्य सरकारने आज पासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईमधील अनेक मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आदी प्रार्थनास्थळे आज पासून उघडण्यात आली आहे. मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेला वरळी येथील हाजी अली दर्गा आजपासून उघडण्यात आला. याठिकाणी कोरोना संदर्भात सूचनांचे पालन करत भाविकांना दर्ग्यामध्ये सोडण्यात येत आहे. यावेळी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याची मागणी मुस्लिम धर्मियांनी केली. तसेच आमच्या अल्लाहचा दरबार उघडल्याने मुस्लिम धर्मियांनी आनंद व्यक्त केला आहे. मुस्लिम धर्मियांनी नियमांचे पालन करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
Last Updated : Nov 16, 2020, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details