Mumbai fire Video : हृदयदावक : इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू - Mumbai fire Video
मुंबई - नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आज सकाळी भीषण आग ( Building Caught Fire mumbai ) लागली. या आगीत 15 जण जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इतरांची प्रकृती स्थिर असून भाटिया, नायर, कस्तुरबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल या ठिकाणी पोचले. येथे दहा फायर इंजिन आणि सात टँकर च्या मदतीने या आगीला नियंत्रणात आणण्यात आली. मात्र अद्याप आग लागण्याचं कारण अस्पष्ट असून याबाबत प्रशासन चौकशी करेल अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
Last Updated : Jan 22, 2022, 2:01 PM IST