मोदींच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील चेहरे ही शिवसेना-राष्ट्रवादीची देण - संजय राऊत - संजय राऊतांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया
मुंबई - नवीन केंद्रीय मंत्र्यांना आपला देश सांभाळायचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. कोरोनाविरोधात लढा सुरू असताना देशात महागाई देखील वाढतीए. त्यामुळे ही सर्व परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर आली आहे, असेही ते म्हणाले. नारायण राणे यांना लघू सूक्ष्म मध्यम उद्योगाचे एक खाते दिले आहे, मात्र महाराष्टाचे मुख्यमंत्री राहिलेल्या राणेंची उंची या पदापेक्षा बरीच मोठी आहे, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. तसेच भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानले पाहिजेत, आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळासाठी नवे चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा चेहरा हा पूर्णपणे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे, अस म्हणत चिमटा घेतला.
Last Updated : Jul 8, 2021, 12:25 PM IST