महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Navneet Rana In Running Competition : अन् इतर महिलांना मागे टाकत खासदार नवनीत राणा धावण्याच्या शर्यतीत ठरल्या अव्वल.. - हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ

By

Published : Dec 26, 2021, 10:53 PM IST

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) या नेहमी या न् त्या कारणाने सातत्याने चर्चेत राहत असतात. कधी नृत्य तर कधी कमरेला बांधलेले ढोल, यामुळे त्या चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा नवनीत राणा या एका कारणाने चर्चेत आल्या आहे. ते कारण आहे, धावण्याच्या शर्यतीचे. त्याच झालं असं, अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्यावतीने ( Hanuman Vyayam Prasarak Mandal ) धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात महिलांसोबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सहभागी होत, स्वतः धावून ( Navneet Rana In Running Competition ) महिला स्पर्धकांचा उत्साह वाढवला. एखाद्या प्रशिक्षित धावपटूसारख राणा यांनी १०० मीटर धावत अव्वल ( 100 Meter Running Competition ) स्थान पटकावले. यावेळी महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी वेळातून वेळ काढून, व्यायाम करावा व स्वतःला सुदृढ ठेवावे, असं सांगितलं.

ABOUT THE AUTHOR

...view details