VIDEO : खासदार नवनीत राणांनी घेतला गरब्याचा आनंद; व्हिडीओ व्हायरल - नवनीत राणा गरबा व्हिडीओ
अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी पंतप्रधान मोदींचे कौतूक तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, तर कधी मेळघाटात आदिवासी बांधवांना सोबत केलेल आदिवासी नृत्य तर कधी कमरेला बांधलेले ढोल अशा एक ना अनेक कारणांमुळे त्या सातत्याने चर्चेत असताच. आता पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खासदार नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत. सर्वसामान्य महिलांसोबत नवरात्रीच्या उत्सवात सहभागी होऊन गर्भानृत्यावर खासदार नवनीत राणा यांनी जोरदार ठेका धरून नृत्य केले आहे. खासदार नवनीत राणा यांचा हा नवा अंदाज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.