VIDEO : खासदार नवनीत राणा यांनी केली छटपूजा - छटपूजा बातमी
अमरावती - छत्री तलाव येथे खासदार नवनीत राणा(MP Navneet Kaur Rana) यांनी बुधवारी सायंकाळी छटपूजा(Chhath Puja) केली. यावेळी अनेक भविकांसोबत खासदार राणा यांनी दिपपूजन आणि जलार्पण केले. छटपूजा ही आपली संस्कृती असून या पुजेमुळे आपली आमुहिक शक्ती वाढते. तसेच ही पूजा केल्याने आत्मिक आणि आध्यात्मिक सुख प्राप्त होते, असे खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.