कोल्हापूर मूक आंदोलन : खासदार धैर्यशील माने हाताला लावलेली सलाइन घेऊनच आंदोलनात दाखल - खासदार धैर्यशील माने सलाईन घेऊन मूक आंदोलनात दाखल
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी (16 जून) कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मानेही सहभागी झाले होते. माने नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांची प्रकृती अजूनही ठिक नसल्याने सलाइन लावूनच ते या आंदोलन ठिकाणी दाखल झाले होते. शिवाय एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी असल्याने काहीही करून आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा होती, असेही त्यांनी म्हटले. 'समाज बोलला आहे. आम्ही बोललो आहे. आता लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी आपली भूमिका मांडावी' यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलनाची हाक दिली. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदार आणि तीनही मंत्री सहभागी झाले होते. या आंदोलनात खासदार माने यांनी सलाइन लावूनच उपस्थिती लावल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Last Updated : Jun 16, 2021, 5:18 PM IST