महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान शिर्डी साईदरबारी; म्हणाले, आत्मनिर्भर राज्य बनविण्यासाठी जनतेचा सहयोग हवाय... - Shivraj Singh Chouhan in Shirdi 31 december 2021

By

Published : Jan 1, 2022, 12:57 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांची सगळ्यांवर कृपा बरसो आणि कोरोनाचे संकट दुर व्हावे, यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. आत्मनिर्भर मध्यप्रदेशसाठी जनतेचा सहयोग हवा आहे. त्यांच्या सहयोगाशिवाय काही होणार नाही. आत्मनिर्भर भारत बरोबरीने आत्मनिर्भर मध्यप्रदेश बनविण्याचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जनतेच्या सहकार्याने तो पुर्ण करत कोरोनालाही हरवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( Shivraj Singh Chouhan in Shirdi )दरवर्षी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन शिवराज सिंह चौहान सहपरिवार साई दरबारी आवर्जून हजेरी लावत असतात. शुक्रवारीही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शिवराज सिंह चौहान सह परिवार शिर्डीत दाखल झाले. यानंतर साईबाबांच्या मंदिरात जावुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. शनिवारी 1 जानेवारीला नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने चौहान साईबाबांच्या दुपारच्या 12 वाजता होणाऱ्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावणार आहेत. ( Shivraj Singh Chouhan Visited Shirdi Sai Temple )

ABOUT THE AUTHOR

...view details