मोदीजी त्यांच्या वाढदिवसाला पेट्रोल-डिझेल स्वस्त करून 'बर्थडे गिफ्ट' देतील - संजय राऊत - संजय राऊत ताज्या बातम्या
मुंबई - आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिला आहेत. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असले तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच देशातल्या महागाईविरोधात जनतेच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे मोदीजी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील, अशा खोचक टोलाही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
Last Updated : Sep 17, 2021, 12:42 PM IST