'एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर मनसेचा दणका बसेल' - Imtiyaz Jaleel criticized raj thackeray
मुंबई - एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावे. राज ठाकरेंबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. राज ठाकरे यांच्या नादाला लागल्यास मनसेचा दणका बसेल, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. अनेक वर्षे राजकारणात असताना राज ठाकरे यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांच्यावर एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना नांदगावर बोलत होते.