मनसे वर्धापन दिन: राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे... - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (९ मार्च) १४ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त नवी मुंबईतील वाशीमध्ये पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. यावेळी मनसेच्या 'शॅडो कॅबिनेट'ची घोषणा करण्यात आली. त्यांनतर राज ठाकरेंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पाहुयात नेमके काय म्हणाले राज ठाकरे...