Health Department Paper Leak : आरोग्यमंत्र्यांसहित संपूर्ण यंत्रणेची न्यायालयीन चौकशी करा, आमदार पडळकरांची मागणी, सीबीआयकडे जाण्याचा इशारा - आटपाडी
राज्याच्या आरोग्य विभागात भरतीसाठी झालेल्या परीक्षेचा पेपर फुटला (Health Department Paper Leak) होता. हे प्रकरण म्हणजे आघाडी सरकारच्या वसुलीचा घोडेबाजार असून, याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांसह संपूर्ण यंत्रणेची चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली (Padalkar Demands Investigation) आहे. चौकशी न झाल्यास सीबीआयकडे जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.