अन् रोहित पवार झाले सैराट..कोविड सेंटरमध्ये झिंगाटवर केला अफलातून डान्स - रोहित पवार सैराट डान्स
बारामती- कर्जत- जामखेड तालुक्यातील गायकरवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून या कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी रोहित पवार यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत सैराट सिनेमातील प्रसिद्ध झिंग-झिंग झिंगाट गाण्यावर थिरकले.