मी असुरक्षित आहे म्हणून तर जनता सुरक्षित आहे - आमदार निलेश लंके - Sharad Chandra Arogyamandir MLA Lanke
पुणे - कोरोना महामारीत सर्वसामान्य नागरिकांसाठी शरदचंद्र आरोग्यमंदिर या नावाने कोविड रुग्णालय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सुरू केले. येथे त्यांनी दिवसरात्र रुग्णांची सेवा केली. त्यांच्या या कार्याने ते देशासह राज्यात चर्चेत आले. त्यामुळे, लंके यांचा पुण्यातील दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर, त्यांनी उभारलेल्या कोविड रुग्णालयाला 21 हजार रुपयांची देणगी देखील देण्यात आली. यावेळी, कोरोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना लंके यांनी केली.
Last Updated : May 26, 2021, 10:57 PM IST