Video : न्यायदेवतेने सरकारच्या कानशिलात लगावली - आमदार हरीश पिंपळे - बारा आमदारांचे निलंबन रद्द
अकोला - विधानसभेत नेहमी तत्पर असलेले आणि विषय मांडणारे भाजपच्या सक्रिय आमदारांवर जाणीवपूर्वक कारवाई केली आहे. या कारवाईला न्यायालयाने आज चुकीचे ठरवीत भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घेतले. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या कानशिलात मारल्याचे न्यायालयाच्या निकालावरून समोर आले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया निलंबन रद्द झालेले मूर्तिजापूरचे भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांनी आज 'ईटीव्ही भारता'ला दिली आहे.