महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मंत्री यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार; धनंजय मुंडे प्रकरणी बोलणे टाळले - Yashomati Thakur voted in Amravati

By

Published : Jan 15, 2021, 1:15 PM IST

अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील मोझरी या आपल्या गावामध्ये दुपारी १२ वाजता सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. स्वतः रांगेत लागून त्यांनी मतदान केले आहे. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी मतदारांना केले. दरम्यान धनंजय मुंडे प्रकरणी त्यांना विचारणा केली असता, त्याबद्दल मला फार काही माहिती नसल्याचे सांगत यशोमती ठाकूर यांनी बोलणे टाळले..

ABOUT THE AUTHOR

...view details