'मी मागासवर्गीय आयोगाची बैठक बोलावली नाही' - vijay wadettiwar nagpur
नागपूर - मागासवर्गीय आयोगाची कुठलीही बैठक मी बोलावली नसल्याची प्रतिक्रिया बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इतकेच काय तर बैठकीसाठी माझ्या ॲाफीसने कुणालाही पत्र दिलेले नाही. तसेच आयोगाच्या बैठकीबाबत असत्य वृत्त आले आहे, ते चुकीच्या माहितीच्या आधारावर आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.