केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली सपत्निक बैलजोडीची पूजा - Raosaheb Danve celebrate bailpola
जालना - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जवखेडा दानवे या आपल्या गावात बैल जोडीची सपत्नीक पूजा केली, मूळचे शेतकरी असलेले रावसाहेब दानवे दर वर्षी बैल पोळा सणाला आपल्या गावात येऊन बैल जोडीची पूजा करत असतात. आजही ते सकाळ पासूनच जवखेडा या गावी सहकुटुंब दाखल झाले होते. त्यांनी विविध रंगांनी सजवलेल्या बैल जोडीचा कासरा हातात धरून वाजतगाजत पोळा सणांच्या उत्सवात सहभाग घेतला. दानवे प्रत्येक वर्षी न चुकता पोळा सणासाठी गावात दाखल होतात. दानवे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील प्रत्येकजण या वेळी गावात येऊन हा उत्सव साजरा करत असतात.