राज्यमंत्री बच्चू कडूंनी अपंग बहिणींसोबत साजरा केले रक्षाबंधन - बच्चू कडूंनी अपंग बहीणींसोबत साजरा केले रक्षाबंधन
अमरावती - रक्षाबंधन हा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधून हा सण साजरा करते. सातत्याने दिव्यांगांसाठी आवाज उठवणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही आपल्या मतदारसंघातील दिव्यांग बहिणीसोबत राखी पौर्णिमेचा हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी अनेक दिव्यांग भगिनींनी बच्चू कडू यांना राखी बांधून रक्षणाचा वचन मागितले.