भाजप आणि देशातील सगळ्या नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करावी - बच्चू कडू - bacchu kadu on bjp
अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे अवैध संपत्ती असल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रवी राणांनी भाजपच्याही नेत्यांच्या संपत्तीकडे बघावं, त्याच बरोबरच भारतातल्या सर्व नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं.