पंतप्रधान किसान सन्मान योजना वादाच्या भोवऱ्यात; मंत्री बच्चू कडू यांनी घेतली दखल - मंत्री बच्चू कडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांना दर ४ महिन्याला २ हजार रुपये सन्मान म्हणून देण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील नवीन शेतकऱ्यांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे पुढे आले आहे.