सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एन.डी. पाटील - अशोक चव्हाण - एनडी पाटील काळाच्या पडद्याआड
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ते विधीमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहिल, अशी भावनिक प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एन.डी. पाटील यांच्या निधनावर व्यक्त केली आहे.