...तर लवकरात लवकर शाळा केल्या जातील - आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे मुंबई पब्लिक स्कूल
मुंबई - बोरिवलीतील मुंबई पब्लिक स्कूल मधील CBSE बोर्ड लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसोबत महापौर किशोरी पेडणेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, प्रकाश सुर्वे यांची उपस्थिती होती. कोविड गेल्यावर लवकरात लवकर मुंबईतील सर्व शाळा सुरू होणार आहेत, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करू, असेही त्यांनी सांगितले. तर राज्यपालांच्या संदर्भात मी जास्त काही बोलणार नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलेले आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण खूप वाईट आहे. पण त्या प्रकरणामध्ये दहा मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी पोचलेली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आम्ही ओळखून या प्रकारात खरे तर काम केलेले आहे. कोणताही कायदा बनत असताना तो फुलप्रूफ असावा लागतो. त्यासाठी शक्ती कायद्यासंदर्भातही तो आणखी कडक कसा होणार? यासंदर्भात काम सुरू आहे आणि लवकरच शक्ती कायदा अस्तित्त्वात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.