साकीनाका येथील बलात्काराची घटना दुर्दैवी - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार - Jalna heavy rain Abdul Sattar
जालना - साकीनाका येथील बलात्काराची घटना घडली ती दुर्दैवी. या घटनेतील एक आरोपी ट्रेस झाला आहे, अशी प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. आज सत्तार यांनी जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साकीनाका बलात्कार प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे, असे सांगत या प्रकरणात सखोल चौकशी सुरू असून, पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत असल्याचे देखील सत्तार यांनी सांगितले.
Last Updated : Sep 13, 2021, 2:22 PM IST