वैजापुरात पेटणार दूध आंदोलन - शेतकरी नेते धनंजय धोरडे पाटील - दूध संघ बातमी
वैजापूर (औरंगाबाद) - कोरोनाचा गैरफायदा घेत खासगी दूध कंपन्या व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांनी पाडले आहेत. पूर्वी शेतकऱ्यांना दुधासाठी 30 ते 35 रुपये दर मिळत होता. मात्र, निर्बंध जाहीर होताच टप्प्याटप्प्याने हे दर संघटितरीत्या पाडण्यात आले असून अता केवळ 20 ते 22 रुपये लिटरवर आणण्यात आले आहेत. यावरुन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने या विरोधात आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी (18 जून) तालुक्यातील लाखगंगा गावात मोठी ग्रामसभा आयोजित केली असून या ग्रामसभेत राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याची भूमिका जाहीर करणार आहे.