लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा कोल्हापुरात येऊ, परप्रांतियांचा विश्वास - मजुरांसाठी विशेष रेल्वे बातमी
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून मध्यप्रदेश येथील जबलपूर जाण्यासाठी मंगळवारी (दि. 11मे) एक रेल्वे सोडण्यात आली. यावेळी उपस्थित प्रवाशांशी बातचीत केली असता आम्हाला खूप आनंद होत आहे. शासनाने एक पैसाही न घेता आमच्यासाठी तिकीट आणि खाण्यापिण्याची सोय केली. यामुळे महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी असल्याचे म्हणत टाळेबंदी संपून ज्यावेळी सर्व सुरळीत होईल त्यावेळी पुन्हा कोल्हापुरात येऊ, असा विश्वास मध्यप्रदेशला जाणाऱ्या परप्रांतिय कामगाराने व्यक्त केला.