टाळेबंदीतही 'मनरेगा'ने दिला हजारो हातांना रोजगार - satara breaking news
मागेल त्याला काम हे ब्रीद तंतोतंत खरे ठरवत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळातही सरासरी सात ते आठ हजार ग्रामीण अकुशल लोकांना रोजगार देऊन शासनाच्या या विभागाने दिलासा दिला. टाळेबंदीच्या सहा महिन्यांच्या काळात व्यवहार बंद झाले. कामे ठप्प होऊन चलनवलन थांबले असताना मनरेगा अंतर्गत शासन वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना प्राधान्य देत अवघ्या दोन आठवड्यात अकुशल हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरले.
Last Updated : Jan 21, 2021, 11:33 PM IST